You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या यशस्वी अष्ठवर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ” शिवार बैठकीचा ” शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या यशस्वी अष्ठवर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ” शिवार बैठकीचा ” शुभारंभ

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून , ह्या आठ वर्षात देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या . म्हणुनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले आहे .

या शिवार बैठकीचा शुभारंभ मंगळवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी १२ = ०० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावामध्ये करण्यात येणार आहे . खानोली येथील ” स्वाद ” या फळप्रक्रीया उद्योगाचे मालक व आंबाबागायतदार तसेच किसान मोर्चाचे जिल्ह्याचे सल्लागार रामकृष्ण उर्फ बाळा सावंत यांच्या आंबाबागेत शिवार बैठकीचे आयोजन केले आहे .

यावेळी भाजपा रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत तसेच किसान मोर्चाचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत , तरी जास्तीत जास्त शेतकरयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा