You are currently viewing वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला शाळेच्या दहावी १९९३ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला शाळेच्या दहावी १९९३ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

२९ वर्षानंतर झाली मित्रांची अनोखी भेट,विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगत व जुन्या आठवणींना उजाळा

वेंगुर्ला

वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला मधील एस. एस. सी. गृप १९९२ – ९३ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा “स्नेह मेळावा” शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे स्नेहमेळावा यादगार ठरला.

वेंगुर्ला सागरेश्वर बीच येथील ‘ दर्याराजा बीच रिसाँर्ट ‘ या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रख्यात असलेल्या या रिसॉर्टवर संपन्न झालेल्या या मेळाव्यात गृप मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
क्ष सुमारे २९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअर मधील चढ उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने मोकळी झाली व पूढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला.
एस. एस. सी. नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी- व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थीनी तब्बल २९ वर्षानंतर या स्नेह मेळाव्यात एकत्र आले होते. वेंगुर्ला, गावांमधील स्थायिक व आता नोकरी निमित्ताने पुणे,मुंबई, गोवा,कतार,मध्यप्रदेश मध्ये असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग असलेला हा मेळावा नियोजनबद्ध कार्यक्रम व सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या नियोजनबद्ध संयोजना द्वारे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी राकेश परब,सुमन परब,बाळा आरांवदेकर, सुधीर गावडे,विनोद परब,आनंद परब, अनंत परब,हेमंत चव्हाण,यशवंत उर्फ बली नाईक,केदार आंगचेकर, प्रसाद मराठे,नामदेव सरमळकर,ललिता जाधव,मनिषा पालव,उल्का वेंगुर्लेकर, प्रतिभा परब,लक्ष्मण परब,विवेक नाईक,रुपाली वेंगुर्लेकर, उल्का सातवेकर,अमिना कुन्नत,वर्षा सावंत,ललिता फाटक,साधना फाटक,जाँयसी कार्डोज,ब्रुदेश अरांऊज,शालीनी अणसूरकर,शैलेश सातार्डेकर,महेश राणे,जयेंद्र गावडे,राजन कांबळी,महेंद्र जाधव,विलास परब,संजु फर्नांडिस, दिंगबर आरोलकर,नरेंद्र नाईक,अमित परब,दिपक कांबळे,आनंद प्रभु,प्रशांत सावंत,संतोष पिंगुळकर,सुनिल सावके,शाम केरकर,सुरज केरकर,गुरुनाथ तांडेल,नाना कासवकर,निलेश भोसले,निलेश गंगावणे,रेश्मा वरसकर,सारीका पाटील,संतोष परब,संतोष गोरे,प्रभाकर देऊलकर,गंगाराम परब,रोहन रणभिसे,उपस्थित होते.
स्नेहा मेळाव्याच्या अल्पोपहारात घावणे व चटणी असा बेत होता. अल्पोपहासह दुपारचं स्वादिष्ट जेवण, आईस्क्रीम व केक अशा मेजवानीने या मेळाव्यात अधिकच गोडी वाढली.
दुपारच्या सत्रात मनोरंजनात्मक खेळ होते.संगीत खर्ची,पोत्यात पाय घालून पळणे,लिंबू चमचा,रस्सी खेच,असे खेळ घेण्यात आले.यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी बालमित्र समजूनच हे खेळ खेळण्याची मजा लुटली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राकेश परब यांनी या मेळाव्याची संकल्पना कशी आली व ती पुढे कशी आली व पुर्ण झाली याबद्दल सविस्तर सांगितले, सुत्रसंचालन सुमन परब, तर आभार सुधीर गावडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा