You are currently viewing सिटू संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिटू संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांच्याकडे केले सादर

ओरोस

३० मे या स्थापना दिनानिमित्त सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांना देशातील महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी व आशा गटप्रवर्तक यांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत प्रधानमंत्री, भारत सरकार यांना हे निवेदन देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा प्रियंका तावडे, खजिनदार नम्रता वळंजू, उपाध्यक्ष अर्चना धुरी, जिल्हा कमिटी सदस्य अंकिता कदम व आरोही पावसकर यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा हे निवेदन दिले जात आहे. तसेच जिल्हा सचिव कॉ. विजयारानी पाटील यांनी ईमेल द्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा समन्वयक यानाही आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन आज सकाळी पाठवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा