You are currently viewing इन्सुली गावातील ॲब्युलन्स व्यावसाईक हेमंत वाघळे यांनी दाखवली सामाजिक बांधीलकी

इन्सुली गावातील ॲब्युलन्स व्यावसाईक हेमंत वाघळे यांनी दाखवली सामाजिक बांधीलकी

कोरोना बाधीत मृतदेहांचे अत्यंसंस्कार करण्याचा उचलला विडा

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातला इन्सुली गावातील ॲब्युलन्स व्यवसाईक हेमंत वाघळे यांने सामाजीक बांधीलकी दाखवत युवकांची टीम तयार करुन संशयीत कोरोना बाधीत मृतदेहांचे अत्यंसंस्कार करण्याचा विडा उचलला आहे. या टीममध्ये १८ ते ३० वयोगटातील ७ युवक व १ युवती सहभागी आहेत. आतापर्यत जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त मृतदेहाचे दहन या टीमने केले आहे.

या टीममध्ये हेमंत वाघळे, वसिम वागळे, अमरदिप कोठावळे, सोयल शेख, साजित संधी, हर्षद मळेकर, परप्रांतीय युवक अजल कडुलमल, एक अठरावर्षीय युवती यांचा सहभाग आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा