You are currently viewing भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ” शिवार बैठका ” घेणार

भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ” शिवार बैठका ” घेणार

उमेश सावंत, जिल्हा संयोजक – किसान मोर्चा, सिंधुदुर्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अष्ठवर्षपुर्ती निमीत्त आयोजन

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाली , ह्या आठ वर्षात देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या . म्हणुनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन केले आहे . या बैठकांमध्ये शेतकरयांना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे .


किसान मोर्चा चे प्रदेश संयोजक वासुदेव नाना काळे यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग किसान मोर्चा ची जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हा संयोजक उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .यावेळी तालुका निहाय शिवार बैठकांचे नियोजन करण्यात आले .
*या शिवार बैठकांचे वैशिष्ट्य म्हणजे , ह्या बैठका शेतकरयांच्या बांधावर , आंबा – काजू बागायतदारांच्या बागेमध्ये , कुकुटपालन करणारया पोल्ट्री परिसरामध्ये , फलोत्पादन करणारया नर्सरीमध्ये , माड बागायतीमध्ये , कृषी पर्यटन करणारया पर्यटन संस्थेत , फळ प्रक्रीया उद्योगाच्या ठीकाणी शेतकरयांना एकत्रित करून या शिवार बैठका घेण्यात येणार आहेत .*
पी.एम.किसान योजनेचा जास्तीत जास्त शेतकरयांना लाभ मिळण्यासाठी , लाभार्थांना ओळख पडताळणी पुर्ण करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे . या मुदतवाढीचा फायदा सर्व सामान्य शेतकरयांना मिळण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरयांना मदत केली जाणार आहे .
*” गाव तीथे – किसान मोर्चा “* या संघटनात्मक रचनेत प्रत्येक तालुक्यामध्ये किसान मोर्चाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . तसेच *मंगळवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र – वेंगुर्ले यांना मानाचा ” सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र ” पुरस्कार मिळाल्या बद्दल किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने सहयोगी संचालकांचा सत्कार समारंभ वेंगुर्ले* येथे आयोजित केला आहे .
जिल्हा संयोजक उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा चिटणीस बंड्या सावंत , किसान मोर्चा जि. सरचिटणीस गुरुनाथ पाटील – राजेश माळवदे – बाळु प्रभु , जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. बी.डी.राणे – किशोर नरे , जिल्हा चिटणीस अजय सावंत , जिल्हा महिला संयोजक दिपा काळे , कुडाळ मंडल अध्यक्ष वामन राऊळ , ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक , मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग , सावंतवाडी मंडल अध्यक्ष तुकाराम आमुणेकर , दोडामार्ग मंडल अध्यक्ष नारायण ठाकुर, मालवण उपाध्यक्ष प्रकाश राणे , मालवण सरचिटणीस दिगंबर जाधव , वैभव शेणई – कुडाळ इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा