You are currently viewing जिल्हाधिकारी के.मंजुल्क्षमी यांनी घेतला कोविड – 19 चा आढावा..

जिल्हाधिकारी के.मंजुल्क्षमी यांनी घेतला कोविड – 19 चा आढावा..

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक हॉल येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधीत सर्व अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोबविण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विरोधातील लढा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने आणि चांगले काम करत आहेत. अजून आणखी बरेच काम करावयाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकारी वर्गाने सक्षम पणे काम करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे काम ऑनलाईनही चांगले करावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा