सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडांची कलमे, रोपे यांची खरेदी अधिकृत परवानाधारक रोपवाटीकेमधूनच करावी. कलमे, रोपे खरेदी केल्यानंतर विहीत नमुन्यातील खरेदीची पावती घ्यावी. तसेच संबंधीत रोपवाटीकाधारकाकडे कलमे, रोपे विक्रीचा परवाना असल्याची खात्री करूनच कलमे, रोपे खरेदी करावीत. तसेच रोपवाटीकाधारकांनी कलमे, रोपे यांची विक्री केल्यानंतर खरेदीदारांना विहीत नमुन्यातील पावती द्यावी. केवळ परवाना घेतलेल्या कलमे, रोपांची गुणवत्तायुक्त कलमे, रोपे तयार करून विक्री करावी, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी अचित आडसुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.