You are currently viewing सोनवडे घाट मार्गाच्या ड्रोन सर्व्हेचे काम सुरू…

सोनवडे घाट मार्गाच्या ड्रोन सर्व्हेचे काम सुरू…

खासदार विनायक राऊत यांची माहिती

बहुचर्चित व गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या सोनवडे घाट मार्गाचा प्रश्न हा सिंधुदुर्ग वासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता. कारण पश्चिम महाराष्ट्राला सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात कमी अंतराने जोडणारा हा मार्ग असल्यामुळे व सध्या अस्तित्वात असलेले तीनही घाटमार्ग वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे सदर सोनवडे घाट मार्ग व्हावा ही आग्रही मागणी जनतेतून सातत्याने होत होती. त्यामुळेच खासदार विनायक राऊत  यांनी आमदार वैभव नाईक व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने केंद्र सरकार व राज्य शासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये सदर मार्गाच्या अलायमेंट मध्ये तांत्रिक त्रुटी निष्पन्न झाल्यामुळे सदर मार्गाची अलायमेंट नव्याने तयार करणे भाग पडले.


आता सदर घाटमार्गाची अलायमेंट नव्याने तयार करून त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मा.अधिक्षक अभियंता (डिझाईन) यांची मान्यता सुद्धा प्राप्त झालेली असून आता प्रत्यक्ष जागेवर त्या नवीन अलायमेंटचे ड्रोन सर्व्हे करण्याचे काम मोनार्च नावाच्या कन्सल्टंट कंपनीकडून गुरुवार दि.२६ मार्च २०२२ पासून सुरू झालेले आहे व येत्या एक-दोन दिवसांमध्ये ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.त्यामुळे सोनवडे घाटमार्गाच्या पुर्न मंजुरीचा प्रश्न खासदार विनायक राऊत यांच्या सह आमदार वैभव नाईक व कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या सहकार्याने मार्गी लागत आहे.सदर घाट मार्गाच्या नवीन अलायमेंट प्रमाणे मार्गाची लांबी काही प्रमाणात वाढत असून सदर मार्गावर दोन ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावे लागणार आहेत.संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 950 कोटी एवढा येणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत  यांच्या संपर्क कार्यालयातुन कार्यालयीन सचिव सोमा घाडीगांवकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा