You are currently viewing पटवर्धन चौकात पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई…

पटवर्धन चौकात पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई…

कणकवली

शहरातील पटवर्धन चौकात उभ्या केलेल्या १५ वाहनांवर आज कारवाई करण्यात आली. तर दंड झालेली वाहने पुन्हा चौकात उभी केलेली आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कणकवली पटवर्धन चौकात वाहनांची वर्दळ आणि नेहमीच होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी आज स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले, पोलीस कर्मचाऱ्यांसह आज सकाळी दाखल झाले. यात सकाळच्या सत्रात १५ वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. कणकवली शहरातील पटवर्धन चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच खरेदी अथवा अन्य कामासाठी आलेले वाहनधारक आपली वाहने पटवर्धन चौकात ब्रिजखाली पार्क करतात, त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. आज सकाळी स्वतः सहायक पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी पटवर्धन चौकात अचानक धडक देत अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी बोलताना श्री. हुलावळे यांनी सांगितले, की अनधिकृतपणे वाहने उभी केल्यास केल्यास वाहनचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच मोटर वाहतूक नियमानुसार पहिल्या वेळेस किमान ५०० रुपये दंड व तेच वाहन पुन्हा अनधिकृत पार्किंग केलेले आढळल्यास दीड हजार दंड होऊ शकतो. आजच्या कारवाईवेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, वाहतूक पोलीस हवालदार चंद्रकांत माने, हवालदार बाईत, हवालदार चंद्रकांत झोरे, वाहतूक पोलीस नाईक विजय कलकुटकी, सुनील निकम, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी कुंभार आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा