जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना
तू आभाळ मी रे धारा
चिंब भिजले झेलीत धारा
साजना, थोडं पावसात
भीज ना
हा खट्याळ बघ रे वारा
उडते पदर झेलीत धारा
साजना, थोड पावसात
भीज ना
मी सुगंध मकरंद फुल
प्रीत देतोय शब्द झुल
साजना, प्रीत झुल्यावर
झुल ना
डोळा भरली तुझी छबी
ह्दयी गंध प्रीत डबी
साजना,थोडं प्रीत गीत
बोल ना
मोर नाचुनी तो दमला
रंग प्रीत मनी चुमला
साजना,थोडं मोरपंखी
स्पर्श ना
दोघे होऊ पाऊस थेंब
भिजवू शेत शिवार चिंब
साजना,चल हिर्व अंकुर
होऊ ना
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.