गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.श्री.प्रमोदजी सावंत यांना तुळस गावचे आराध्य दैवत श्री देव जैतीर उत्सवाचे निमंत्रण श्री देव जैतीर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तुळस चे सचिव श्री. विजय रेडकर यांनी दिले . यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. प्रफुल्ल ऊर्फ बाळू प्रभू इत्यादी उपस्थित होते . यावेळी श्री देव जैतीर उत्सवाबाबत चर्चा केल्यानंतर त्याच दिवशी ३० मे रोजी गोवा राज्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने मला श्री देव जैतीर दर्शनासाठी येणे शक्य नाही , पण भविष्यात श्री देव जैतीर दर्शनासाठी अवश्य येईन असे अभिवचन त्यांनी दिले*.
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावच्या प्रसिद्ध जैतीर उत्सवाचे गोवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
- Post published:मे 27, 2022
- Post category:बातम्या / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न- आ. वैभव नाईक
आरोंदा चेकपोस्ट युवक-युवतींसाठी खुले करा; निवेदनाद्वारे मागणी
व्हेंटिलेटर नसतानाही बिल आकारल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक
