मालवण :
आज समाजामध्ये तथागत गौतम बुद्धांचे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचेविचार आत्मसात केले तर समाजाची प्रगती झपाट्याने होईल असे मत माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी मसुरे देऊळवाडा येथे बोलताना केले.
बौद्ध विकास मंडळ मसुरे यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच मसुरे देऊळवाडा येथे माजी जि प माजी अध्यक्ष सन्माननीय संग्राम प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाने संपन्न झाली. यावेळी विचार मंचावर माजी प स सदस्य महेश बागवे, डॉक्टर चंद्रकांत बोरकर, ग्रामीण अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई अध्यक्ष अजित तांबे, महिला अध्यक्ष मृदुला तांबे, सचिव वेदिका तांबे, मुंबई सचिव संतोष तांबे, मिलिंद तांबे,आनंद तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते महेश बागवे बोलताना म्हणाले मसुरे गावात सर्व जाती धर्माच्या बांधवाने वेढलेला आहे तिथे सगळ्या प्रकारचे उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने केले जातात मसुरे गाव हा जातविरहित गाव आहे लवकरच येथे सर्व सुविधांनी युक्त असा अद्यावत बुद्ध विहार सर्वांच्या सहकार्याने येत्या वर्षभरात पूर्ण करणार असून यासाठी जे सहकार्य लागेल ते सर्व देण्याचे अभिवचन दिले.
यावेळी दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण या मुलांचा सन्मान करण्यात आला. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मृतींना आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.
या जयंतीच्या निमित्ताने एक नवीन संकल्प जाहीर करण्यात आला की मसुरे गावांमध्ये बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प केला यावेळी सर्व मान्यवरांनी त्याचे स्वागत करून अधिकाधिक मदत करण्याचे आश्वासन दिले. या वाडीतील सर्व महिला बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल तांबे, बाबुराव तांबे, गणेश तांबे, सुनील तांबे,दीपक तांबे, मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे आभार मेनका तांबे यांनी मानले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत.