You are currently viewing गंधर्व तुंबरू

गंधर्व तुंबरू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक श्री अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

वैशाख कृष्ण अष्टमीला सर्वश्रेष्ठ गंधर्व तुंबरु जयंती दि.23मे ला झाली.त्या निमित्त साष्टांग दंडवत.

*”गंधर्व तुंबरू”*

तुंबरु गायक गंधर्वराज विख्यात
स्वर्गीय गायन सूर्य हरीहर भक्त।।ध्रु।।
माता प्रधा पिता कश्यप ऋषी होत
चार बंधू असती गंधर्व सर्वज्ञात
तुंबरु करिती गायन भक्तिरस निर्मित।।1।।
मधुर गळा गायक अद्वितीय पंडित
हाती वीणा चीपळ्या दुसऱ्या करांत
नारदांचे परममित्र दोघे गान तज्ञ।।2।।
करी शिवोपासना मिळवे वरप्रसाद
मिळे अश्वमुख संचार त्रीखंडा मुक्त
सर्वश्रेष्ठ गायक रूपे अमरत्व प्राप्त।।3।।
विष्णु शंकर इंद्रादी देवा आवडे संगीत
तुंबरू विष्णूचे भक्त नित्य पार्षद
त्यांनी सेवा केली सर्व विष्णू अवतारांत।।4।।
तुंबरु ने दिले अर्जुना गंधर्व शस्त्र
शिखंडीला दिले रथ अश्व महाभारतात
शंभरअश्व दिले अश्वमेध यज्ञात।।5।।
शाप दिला तुंबरुस नाराज कुबेरानं
जव शतहृदांच्या पोटी जन्मला विराध
ब्रह्मदेव दिला वर मृत्यू न व्हावा शस्त्रानं।।6।।
विराध झाला सीता लंपट दंडकारण्यात
राम-लक्ष्मण केले त्याचे बरोबर युद्ध
रामानं केला त्याचा वध केले शापमुक्त।।7।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा