You are currently viewing सांज सावल्या

सांज सावल्या

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना

निळ्या सावळ्या नभांमधूनी खुलली ही सांज
दूर कुठे तरी गाभाऱ्यातूनी ऐकू येई झांज

परवचा चे बोल घुमती घरा घरांमधूनी
आजीचा तो हरिपाठ मग ऐकू येई कानी

देवळा मधूनी वाजत होता आरतीचा चौघडा
आरतीच्या पाठोपाठच मग पुष्पांजली चा सडा

प्रसादास मग येती पुढती इवले इवले हात गडे
त्या हातांवर हळुवार पडती खडी साखरेचे खडे

रात्रीच्या जेवणात असे तो मऊ गुर्गुट्या भात
मेतकूट अन् तूप वाढता आजीचा सढळ होई हात

अंगणात मग पडे अंथरूण चांदण्यांच्या खाली
अंगाईच्या सुरांसवे झोप डोळ्यां सवे बोलली

झोपेतच हे स्वप्न दिसे मज मी आजीच्या कुशीत
गोंजरूनी ती पापा घेई येई मग खुशीत

सौ. अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
२६/५/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा