केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती एकाच केंद्रावर उपलब्ध
“अर्चना फाउंडेशन’ यांच्याद्वारे मोफत नवीन आधार कार्ड व दुरुस्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष “आधार अभियान 2022′ यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे यशस्वी शिबिर आयोजित करण्यात आल्यानंतर सावंतवाडी येथे “आधार अभियानांतर्गंत’ मोफत शिबिराचा लाभ नागरिकांकडून घेतला जात असून या अभियानाचे यशस्वी आयोजन मा. अर्चना घारे यांनी केले आहे.
“आधार कार्ड सेंटर’ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती, ही बाब लक्षात घेत अर्चना घारे यांनी सुरूवातीला दोडमार्ग, वेगुर्ला येथे “मोफत आधार अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला, त्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव सदर अभियान सावंतवाडी येथे राबविण्यात येत असून याअंतर्गत नवीन आधार कार्ड काढणे, पत्ता बदलणे, नावात दुरुस्ती अथवा बदल करणे, फोटो अपडेट करणे, जन्मतारीख दुरुस्त करणे, फोन नंबर बदलणे, आधार कार्ड मोबाइलला लिंक करणे आदी कामे नागरिकांना अगदी मोफत करून दिली जात आहेत.
आधारकार्ड नव्याने काढणे याकामांसह आयुष्यमान भारत कार्ड योजना, नवीन पॅनकार्ड व दुरूस्ती, सुकन्या समृद्धी योजना, नवीन मतदान कार्ड व दुरस्ती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ई-श्रम कार्ड, पीएम किसान योजना या केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे त्याबाबत सहकार्य करण्याचे कामही या अभियानांतर्गत करण्यात येत आहे. सावंतवाडी येथील राणी पावर्त देवी हायस्कुल येथे सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 यावेळेत सदर अभियान राबविले जात आहे. या अभियाचा लाभ नगारिकांनी घ्यावा, असे अवाहन मा. अर्चना घारे यांनी केले आहे. दरम्यान, आधार कार्ड, पॅनकार्ड, ई-श्रमकार्ड यासह अन्य योजनांच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना पायपीट करण्यासह तासन तास ताटकळत बसावे लागत होते, मा. अर्चना घारे यांच्या माध्यमातून सदर
“आधार अभियान 2022’द्वारे ही कामे एकाच केंद्रावर होत असल्यने याचा लाभ शेकडो नागरिकांना होत आहे. याशिवाय या ठिकाणी केंद्र तसेच राज्य शासनाशी संबंधीत सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत नागरिकांना मार्गदर्शनही केले जात असल्याने नागरिकांकडून अर्चना घारे यांचे या अभियानाच्या यशस्वी आयोजनाबाबत आभार व्यक्त केले जात आहेत.