वैभववाडी
तिथवली तांबेवाडी येथील संतोष तानाजी तांबे (वय-५६) यांचा बुधवारी सायंकाळी नदीपात्रात बुडुन मृत्यु झाला. लहान मुलांसोबत ते नदीवर गेले होते.
तिथवली बौध्दवाडी येथील संतोष तांबे हे सायंकाळी तीन चार वाजण्याच्या सुमारास तिथवली येथील शुकनदीवर वाडीतील लहान मुलांसोबत गेले होते. मुल आंघोळ करण्यात मग्न होते. नदीपात्रात त्यांचा पाय घसरुन ते पाण्यात पडले. यापूर्वी त्यांना अर्धांगवायुचा सौम्य ॲटक आल्यामुळे ते शरीराने अधु होते. पाण्यात पडल्यामुळे त्यांना वर उठता आले नाही. मुलांचे त्यांच्याकडे लक्ष गेले त्यांनी आरडाओरड करीत त्यांना पाण्याबाहेर काढले. माञ तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. सायकांळी उशिरा ही माहीती वैभववाडी पोलीस स्थानकात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला होता. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातू, भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.