You are currently viewing सिंधुदुर्ग  जिल्हातील ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सिंधुदुर्ग  जिल्हातील ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या ९ विभागांतर्गत सर्वाधिक ४६ विनंती, प्रशासकीय १५ तर आपसी १२ अशा७३ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक,सह संवर्गनिहाय समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. यात विनंती बदल्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शासन आदेशानुसार गेल्या दोन दिवसात समुपदेशन पद्धतीने बदल्या कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या त्यांत सामान्य प्रशासन, वित्त, ग्रामपंचायत, बांधकाम ,जलसंधारण, महिला बालकल्याण ,ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी, विभागाच्या् संवर्गनिहाय बदल्या करण्यात आल्या जिल्ह्यातील तालुक्यातून तसेच जिल्हा मुख्यालयातून कर्मचारी सिंधुदुर्गनगरी येथील जि प छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या समुपदेशन बदली कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत झालेल्या या समुपदेशन कार्यक्रमांमध्ये उपशिक्षक वगळता अन्य संवर्गातील कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या त्या सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी २ वरिष्ठ सहाय्यक ६, कनिष्ठ सहाय्यक ८, परिचर २, इतर विभागातील सहाय्यक लेखाधिकारी १ कनिष्ठ लेखाधिकारी १, वरिष्ठ लेखाधिकारी २ कनिष्ठ सहाय्यक लेखा १ ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी २ ग्रामविकास अधिकारी २ ग्रामसेवक ९ बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता १
स्थापत्य अभियंता सहाय्यक जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी १ महिला बाल कल्याण विभागातील पर्यवेक्षिका ५ आरोग्य विभागातील औषध निर्माता अधिकारी १ आरोग्य सहाय्यक पुरुष २ आरोग्य सेवक पुरुष४ आरोग्य सेवक महिला १० शिक्षणाधिकारी विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी २ केंद्रप्रमुख १ पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक ६ कृषी विभागातील कृषी विस्तार अधिकारी १ अशा प्रशासकीय १५ विनंती ४६ आणि आपसी १२ एकूण ७३ बदल्या करण्यात आल्या आहेत बदली प्राप्त कर्मचारी येत्या एक जून पासून आपल्या तालुका आणि जिल्हा मुख्यालय येथे बदली ठिकाणी रुजू होणार असल्याचे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा