यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये क्लाइंबिंग मशीन प्रोजेक्टची बाजी
सावंतवाडी
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमार्फत आयोजित राज्यस्तरीय टेक्नोभारती-2के22 या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या ऑटोमॅटिक पोल क्लाइंबिंग मशीन या प्रोजेक्टने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला.
तृतीय वर्ष मेकॅनिकलच्या साहिल सावंत, सतेज दळवी, सोनू नाईक, प्रद्युम्न परब आणि वसंत आईर या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला असून प्रा.मनीष घाटगे यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले…
विद्यार्थ्यांना रु.2000 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
हे मशीन वीज कर्मचारी, तसेच उंचावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असून शिडीच्या वापराऐवजी याचा उपयोग केल्यास त्यांची उंचावरच्या ठिकाणी सुरक्षितपणे ने-आण करू शकते. यामुळे कोणतीही दुखापत होण्याचा धोका टळतो.
हा प्रोजेक्ट यशस्वीपणे तयार केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले व मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.