You are currently viewing सावंतवाडीतील जहीरा खान यांचा काँग्रेस प्रवेश

सावंतवाडीतील जहीरा खान यांचा काँग्रेस प्रवेश

सावंतवाडी :

बाहेरचावाडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जहीरा खान, बासिप बशीर पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून येत्या काळात शहरात कॉंग्रेसचे हात अधिक बळकट होतील असा विश्वास अँड.दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला.

यावेळी ज्येष्ठ नेते विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दिलीप नार्वेकर, अशोक राऊळ, रविंद्र म्हापसेकर, रुपेश आईर, गुरु आईर, विजय कदम, विभावरी सुकी, असलम खतीब, समीर वंजारी, संजय राऊळ, माया चिटणीस, अभय मालवणकर, अरुण भिसे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा