You are currently viewing उद्या पावशीत रक्तदान शिबिर

उद्या पावशीत रक्तदान शिबिर

कुडाळ :

तालुक्यातील पावशी येथील बेलनदी ग्रुपच्या वतीने पावशी ग्रा. पं. सभागृहात २७ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ग्रुपचे शिबिर आयोजनाचे हे पंधरावे वर्ष आहे. या ग्रुपच्या वतीने तसेच रक्तपेढी (सिंधुदुर्ग), पावशी गावतील मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले असून जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन माजी सरपंच श्री लक्ष्मीनारायण मेडिकल स्टोअर्सचे मालक संजय कोरगावकर आणि माजी सरपंच पप्या तवटेे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा