You are currently viewing तारकर्लीतील दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगात..!

तारकर्लीतील दुर्घटनेनंतरही राज्यकर्ते सुशेगात..!

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा आरोप

मालवण :

तारकर्ली येथील दुर्घटनेनंतर राज्यकर्ते सुशेगात आहेत. तारकर्लीत घडलेला प्रकार हा राज्यकर्त्यांचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा व नाकर्तेपणाचा आणि स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री यांचा ढिसाळ कारभाराचा तो कळस होता. एवढी घटना घडूनही स्थानिक आमदार ग्रामीण रुग्णालयात फिरकले सुद्धा नाहीत अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली आहे.

सुदेश आचरेकर आणि दीपक पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, तारकर्ली देवबाग या पर्यटन दृष्टिकोनातून सुप्रसिद्ध व वर्दळीचे पर्यटन केंद्र आहे. जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा तारकर्ली देवबाग मध्ये राहणे. पर्यटनाशी निगडित असलेले वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी येतात. शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. त्या बदल्यात राज्यकर्ते काय सुखसोयी, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतात ? प्रत्यक्षात या सर्व गोष्टींचा राज्यकर्ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात. खरं तर तारकर्ली देवबाग हा पर्यटनाचा केंद्र बिंदू आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देतात. एवढे मोठे पर्यटन स्थळ असूनही त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सेंटर सुविधायुक्त असणे गरजेचे असताना त्याठिकाणी साध्या प्रथमोपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाही. हे मालवण, समस्त कोकण वासीयांचे दुर्दैव आहे. जर प्राथमिक आरोग्य केंद्र त्याठिकाणी (एमटीडीसी) असले असते तर देशमुख व पिसे कुटुंबातील दोन कर्तेकरविते सदस्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला नसता. त्यामुळे सदरील अपघातग्रस्त पर्यटकांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी सुमारे एक ते दीड तासांचा विलंब झाला. तोपर्यंत सर्व काही संपुष्टात आलं. सदरील हे दोन पर्यटक गुदमरून मृत्यू झाले. ते जर स्थानिक पातळीवर तात्काळ प्राथमिक उपचार झाले असते तर पर्यटकांचे प्राण वाचले असते. ज्यावेळी २० पर्यटकांची तारकर्ली येथे होडी बुडाली त्यावेळी जवळपास दहा ते बारा पर्यटक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता, अपुऱ्या सुविधेमुळे काही अपघातग्रस्त पर्यटकांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. कारण ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरसह इतर सुविधा नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर रुग्णांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांना त्वरित उपचार मिळाल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. नाही तर मोठया प्रमाणात जीवितहानी झाली असती. जर काही ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर तात्काळ सुविधा उपल्बध झाली असती तर अनर्थ टळला असता.

एवढे सगळे घडूनही स्थानिक आमदारांना गांभीर्य नाही. ते घटनास्थळी भेट देऊ शकले नाही. परिस्थितीची माहिती घेऊन पर्यटकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करायला वेळ नाही. परंतु जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हास्तरीय प्रशासन भेट देऊन चौकशी करून नातेवाईकांचे सांत्वन करतात. सदरील तारकर्ली एमटीडीसी कडील दुर्घटना ग्रस्त परिसरात अधूनमधून वर्षातून एकदातरी घटना घडल्याचा दुर्दैवी प्रकार घडतो. सदर परिसर डेंजरझोन असूनही त्याठिकाणी लाईफ गार्डची सुविधा राज्यकर्ते देऊ शकत नाही. अगर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना आमदार, खासदार, पालकमंत्री हे स्थानिकांच्या आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना महसूलच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करता येतात परंतु या राज्यकर्त्यांना तात्काळ सुखसुविधा लोकांना, पर्यटकांना देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे अशी टीकाही माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा