You are currently viewing सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीचे तातडीने छप्पर दुरुस्ती करा…

सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीचे तातडीने छप्पर दुरुस्ती करा…

माजी उपनगराध्यक्ष गोविंद उर्फ तानाजी वाडकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी राहत असलेल्या एका चाळीचे छप्पर पूर्णपणे जीर्ण झाले असून, त्या चाळीत राहणारे सफाई कर्मचारी राजन कदम यांच्या खोलीच्या छपराचा काही भाग गेल्यावर्षी पावसात मोडला होता. यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्याला टेकू लावून तात्पुरती डागडुजी केली होती. परंतु, यावर्षीच्या पहिल्याच पावसात तो टेकू सरकल्याने ते छप्पर कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या चाळीतील जीर्ण झालेल्या छप्पर बाबत नगरपालिकेला वारंवार लेखी व तोंडी माहिती देऊनही आणि दुरुस्तीची मागणी करूनही आणि निधी असूनही अद्यापही याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसल्याने तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत तात्काळ दखल घेऊन त्या चाळीची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गोविंद उर्फ तानाजी वाडकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा