विद्यार्थ्यांमध्ये युवतींसह गृहिणींचा सहभाग; स्वयंरोजगार योजने अंतर्गत उपक्रम…
सावंतवाडी
येथील एस. एस. आय कॉम्प्युटर कौशल्य विकास केंद्रांतर्गत स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या “बेकरी प्रॉडक्ट प्रदर्शन-विक्रीला” उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचा शुभारंभ राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व्ही. बी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केक, कोल्ड कॉफी, कप केक, सॅंडविच, पिझ्झा आदींसारख्या अनेक बेकरी प्रोडक्टचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात युवतींसह गृहिणी सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संस्थेचे संचालक रघुनाथ तानावडे, नामदेव सावंत, डुम्मिंग अल्मेडा, श्री.पाटील सर, सिनेरा अल्मेडा, चिन्मयी केळबाईकर, संकेत गावडे, मंदार परब, कविता नाईक, सुखदा नाईक आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.तानावडे म्हणाले, आमच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. याच माध्यमातून “स्ट्रीट फूट वेंडर” अंतर्गत त्यांना बेकरी प्रॉडक्ट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान प्रशिक्षित विद्यार्थ्यांना आपण बनविलेले पदार्थांची विक्री करण्यासंदर्भात आज प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी संस्थेच्या ठिकाणी स्टॉल लावत त्यांनी बनविलेल्या पदार्थांचे “प्रदर्शन व विक्री” हा उपक्रम घेण्यात आला. त्याला ग्राहकांचा सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केक, कोल्ड कॉफी, कप केक, सॅंडविच, पिझ्झा आदींसारख्या अनेक बेकरी प्रोडक्टचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात युवतींसह गृहिणी सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
श्री. तानावडे म्हणाले, हे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. आतापर्यंत ६० विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले असून त्या पैकी ३८ विद्यार्थ्यांनी स्वयम रोजगार निर्माण केला आहे. हे प्रशिक्षण दीड महिन्याच्या कालावधीत दिले जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील अन्य विद्यार्थ्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.