वेंगुर्ले
तालुक्यातील शिरोडा समुद्रात काल बुडालेल्या वेत्ये येथील युवकाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. सुनिल देवू गावकर ( ४५), असे त्याचे नाव आहे. आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिरोडा समुद्र किनारी मृतदेह आढळून आला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी शिरोडा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील तरुण सुनील गावकर हा काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात आंघोळी साठी उतरला असताना मोठ्या लाटा मध्ये कुठे दिसेनासा झाला आणि बुडाला. त्याठिकाणी असलेल्या इतर पर्यटक व मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान पोलसांना या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. मात्र समुद्राला उधाण असल्याने समुद्रात जाऊन त्यांला शोधता आले नव्हते. दरम्यान आज सकाळी गावकऱ याचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात दिसताच समीर भगत, उदय भगत, संतोष भगत, सुरज अमरे, आजू अमरे यांनी तो बाहेर काढून किनाऱ्यावर आणून ठेवला. आणि याची माहिती पोलिसांना दिली आहे.