You are currently viewing पैसा पैसा

पैसा पैसा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

नको धावू धना मागे
तुरे माणसा माणसा
स्वार्थासाठी भोगासाठी
नको करू पैसा पैसा !!

नको करू पैसा पैसा
घाल आवर म्हणाले
अरे पापाची कमाई
नको आणुस घराले !!

नको आणुस घराले
दुःखी कष्टीतांची हाय
नाही सुख शांती मना
रडविते धायधाय !!

रडविते धायधाय
हीच आसुरी संपत्ती
घरा येई रे घेऊन
व्याधी व्यसनं आपत्ती !!

व्याधी व्यसनं आपत्ती
झाले कुटुंब बेजार
अनितीच्या धनापाई
झाला उध्वस्त संसार !!

झाला उध्वस्त संसार
तरी अहंकार कैसा
नको धावू धना मागे
नको करू पैसा पैसा !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा