भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
आपणास बरेच काही सांगून जातो हा शब्द जीवाच्या आकांताने ओरडणे म्हणजे टाहो फोडणे असं म्हणलं जातं आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यावर सगेसोयरे नातेवाईक जीवाच्या आकांताने मारलेली बोंब त्याला टाहो असं म्हणतात
आज सर्व जनता सर्व गोरगरीब लोक सर्वसामान्य निर्धन धनिक सुध्दा आज टोहो फोडून ओरडत आहेत त्यासाठी जबाबदार असणारे त्यांच्यावर कोणताही फरक पडत नाही
** बोगस बांधकाम कामगार नोंदणी
** रेशन घोटाळा
** बेरोजगारी
** शासकीय निमशासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी याचा मनमानी कारभार
** महागाई पेट्रोल डिझेल गॅस खाद्य तेल
** बालकामगारांचा वापर
** महिला अत्याचारांच्या घटना
** नोकरी भरती मध्ये पुढारी नेते खासदार आमदार याचा हस्तक्षेप
** पाणी पुरवठा घोटाळा
** गॅस सबसिडी घोटाळा
** कामगार संघटना मध्ये वाढता महिला सहभाग
** वाढती विज बिल
** वाढते घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांचा घोटाळा
** अतिक्रमण नावाखाली गोरगरीब लोकांना लुटून आपली स्थावर संपत्ती वाढवणारे
** महसूल घोटाळा
** विविध पेन्शन घोटाळा
** माहिती अधिकार कायद्याचा अवमान
** एजंट दलाल यांचा यांचा शासकीय निमशासकीय कार्यालयाला वाढता वेढा
** दस्त घोटाळा बोगस नोंदणी साठी घेण्यात येणारी लाच
** खेळाडू बोगस कागदपत्रे सादर करुन होणारी भरती
** पोलिस मनमानी कारभार
** अपंग योजनांचा बोजवारा
** वाढता देशद्रोह
** औद्योगिक क्षेत्रात होणारें अपघात व शासन व मालक भुमिका
** वाढते वृध्दाश्रामाचे जाळ
** बालसुधारगृहात मिळाणारी मुलांना मुलींना हीन वागणूक
** वाढती व्यसनाधीनता
** वाढती गुंडगिरी. दहशतवाद. नक्षलवादी . टोळीयुद्ध . जातीयवाद. धर्मवाद.
** वाढता राजकीय दबाव
** मतदानासाठी . दारु. जेवण. पैसा. या तंत्राचा वाढता वापर
** शासनाच्या नियमांचे कारणं करून चौकात चौकात जनतेला लुटणारे पोलिस फौजफाटा
** न्यायालयात विविध दावे आजही धुळखात पडले आहेत
** एन ए चे नावाखाली होणारी मनमानी आर्थिक उकळणी
** शहरात गावात अतिक्रमण हटाव नावाखाली गोरगरीब जनतेवर हातोडा
** सैनिक. पोलिस. बॅंका. पतसंस्था. शासकीय निमशासकीय भरती नाही यामुळे बेरोजगारी साप फणा काढून बसला आहे
** वैद्यकीय क्षेत्रातील मोठी लुट डॉ व नर्स. मेडिकल यामधून मनमानी उपचार.ओषधाचे दर. पेशंट व नातेवाईक यांची आर्थिक लूट
** सर्व वैद्यकीय निर्धन लोकांसाठी असणार्या योजनांचा बाजार केला राजकारणी आणि डॉ लोकानी
** भोंगा आणि हनुमान चालीसा यांच राजकारण
** शेतकरी योजनांचा बोजवारा बी. बियाणे. खते. यांचा वाढता दर . शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणार्या अनुदाची होणारी वसुली
अशा एक ना अनेक अडचणी. प्रश्नांनी आज सर्व जनता आकांताने आक्रोश करत आहे पण कोणालाही तिकडं बघण्यास वेळ नाही. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ झाली म्हणून त्यासाठी आंदोलने करणारे यांचेच पंप आहेत कारखाने आहेत त्यांनी ऊस दराबाबत होणारी फसवी आंदोलन करणारे कोण आहेत आत्तातरी ओळखा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९