वेंगुर्ले
तालुक्यातील शिरोडा समुद्रात वेत्येतील तरुण बुडल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्यानी दिली. दरम्यान सायंकाळी उशिरा पर्यंत समुद्राला उधाण असल्याने व गावकर यांचा मृतदेह दिसत नसल्याने शोधकार्य होऊन शकले नसल्याची महिती शिरोडा पोलिसांकडून देण्यात आली.
शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील तरुण आज सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात बुडाला यावेळी त्याठिकाणी असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.
दरम्यान समुद्राला उधाण असल्याने काही क्षणात तो तरुण दिसेनासा झाला. यावेळी तात्काळ घटनास्थळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रा प सदस्य कौशिक गावडे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस योगेश राऊळ, ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आबू, आपा साळगावकर व ग्रामस्थांची धाव घेतली. त्याचा मृतदेह समुद्रात दिसत नसल्याने व समुद्राला उधाण असल्याने शोधकार्य सायंकाळी उशिरा पर्यंत होऊ शकले नाही. यावेळी त्या युवकाचे नातेवाईक व वेत्येतील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पर्यटन हंगामात पर्यटकांच्या पसंतीला शिरोडा समुद्र असून शेकडो पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्रात उधाण असून पर्यटकांनी आपली काळीजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन शिरोडा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.