*7 जण उपचारार्थ दाखल : उपचारानंतर 11 जण घरी*
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): मालवणमधील तारकर्ली येथे जय गजानन नावाची 20 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडून झालेल्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. 7 जणांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, 11 जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णाणलयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.
आकाश भास्करराव देशमुख (वय 30 रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय 41 आळेफाटा पुणे) अशा 2 मृतांची नावे आहेत. रश्मी निशेल कासुल (वय 45 रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे, संतोष यशवंतराव (वय 38 बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत. तसेच मृणाल मनिष यशवंतराव (वय 8), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई. वैभव रामचंद्र सावंत(वय 40 रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय 40 ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुभम गजानन कोरगावकर (वय 22) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय 26 रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय 30), अश्विनी लैलेश परब (वय 30 रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय 40) मनिष यशवंतराव (वय 40) आयुक्तीे यशवंतराव (31 रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णाासो धुमाळे (वय 32), गितांजली धुमाळे (वय 28 रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हा पूर). प्रियन संदिप राडे (वय 18 रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय 31 रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्यात आले आहे.