सिंधुदुर्गनगरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने ०८ ते १२ वर्षाखालील मुले व मुली यांचे ज्युदो व शुटींग या खेळांचे खेलो इंडिया केंद्र मिळालेले आहे. सदरील खेळाचे प्रशिक्षक नियुक्ती करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. तरी या करिता इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २६ मे २०२२ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
त्यानुसार वरील कालावधीत उमेदवारांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगट, यामध्ये अतिउच्च कामगिरी / गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने ५० वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. ऑलिंपिक / एशियन गेम्स/ जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह. जागतिक करंडक स्पर्धा/ एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग/ पदक प्राप्त खेळाडू प्रशिक्षणाच्या अनुभवासह. एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेवलचे कोर्सेस / किंवा बीपीएड, एमपीएड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक प्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह. राज्यस्तर खेळाडू बीपीएड-एमपीएड सह कमीत कमी 10 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असावा. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग विद्या शिरस यांनी दिली.