रोटरी क्लब ऑफ सेंट्रलने पर्यावरण क्षेत्रातील कार्याची घेतली दखल
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने
व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संघटनेच्या पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अध्यक्ष कौशिक मराठे यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संघटनेने शहरातील शिवाजीराव खवरे मार्केटमध्ये ३५० वृक्षारोपण करण्यात येत असून सध्या १५९ झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय शहरात विविध ठिकाणी सुमारे एक हजाराहून अधिक झाडे लावली असून त्यांचे संगोपन व जतन आठवड्यातून दोन दिवस व्हिजन ग्रीन सिटीतर्फे केले जात आहे. यासाठी अशोक पाटणी, गोपाल खंडेलवाल, राजेश व्यास यांच्यासह अनेकांचे योगदान लाभत आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेवूनच रोटरी क्लबच्या वतीने व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष
कौशिक मराठे यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी चंद्रदीप नरके यांनी व्हिजन इचलकरंजी या संस्थेने विविध क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात त्यांच्या कार्यात जी मदत लागेल, ती करणार असून व्हिजनच्या पाठीशी नेहमी उभा राहीन,अशी ग्वाही दिली.
सत्काराला उत्तर देताना व्हिजनचे अध्यक्ष कौशिक मराठे यांनी, व्हिजन इचलकरंजीच्या कार्याचा आढावा घेवून यासाठी परिश्रम घेत असलेल्या व योगदान असलेल्यांचे आभार मानले. तसेच पुरस्कार मिळाल्याने कामाची जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष यतीराज भंडारी,अशोक जैन, कुमार कस्तुरे, प्रशांत कांबळे , डॉ.अमर कांबळे
यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.