You are currently viewing ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे २३ मे रोजी जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे २३ मे रोजी जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर

कणकवली

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या जिल्ह्यातील सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दु.२ वाजता यावेळेत तळेबाजार येथील महालक्ष्मी हाॅल (गढीताम्हाणे रोड) येथे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन देवगड तालुक्याचे तहसीलदार मारुती कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी तसेच कोकण विभागीय अध्यक्ष उपस्थित राहून संघटनात्मक कार्य वाढीकरीता मार्गदर्शन करणार आहेत. सदरचे एक दिवशीय शिबीर जिल्हा संघटक मंदार काणे, जिल्हा उपाध्यक्ष नंदन घोगळे, तसेच देवगड तालुका अध्यक्ष योगेश ( बाळा) धुपकर यांच्या मागणीनुसार देवगड तालुक्यात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहण्याचे नियोजन प्रत्येक तालुकाध्यक्ष/ कार्याध्यक्ष/ सचिव यांनी योग्य प्रकारे करावयाचे निश्चित करण्यात आले आहे. तरी संघटनेच्या सर्व तालुक्यातील सदस्य व पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर व जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा