हेमंत राणे व पकंज दुखंडे यांची माहिती; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केली २५ लाखाची तरतूद…
देवगड
आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फंडातून २५ लाख रुपयांची तरतूद करून दिल्याने देवगड जामसंडे नगरपंचायती सह २२ गावे पाणीटंचाई पासून मुक्त झाली आहे तशी माहिती टेंबवली गावचे सरपंच हेमंत राणे व पंकज दुखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,देवगड तालुक्यातील २२ गावे व देवगड -जामसंडे नगरपंचायत प्रादेशिक नळयोजना पाणीपुरवठा दि १७/५/२०२२ पासून कुठलीही पुर्वसुचना न देता संबंधित कंत्राटदाराने पाणीपुरवठा बंद केले होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराची चौकशी केली असता, ३१ मार्च २०२२ पर्यंत करारनामा होता. तो संपला होता. तरीसुद्धा २ महिने पाणीपुरवठा चालू ठेवला होता. संबंधित विषय गुरूवार दि. १९/०५/२०२२ रोजी आमदार नितेश राणे साहेब यांची भेट घेऊन संबंधित प्रादेशिक नळयोजनेचा विषय त्यांच्यासमोर मांडला. तात्काळ आम.नितेश राणे यांनी संबंधित ठेकेदाराला कॉल करून माहिती विचारली असता, त्याने आपला करारनामा संपला आहे.
व संबंधित करारनाम्याचे २५,००००/- रक्कम पंचवीस लाख) जिल्हा परिषदेमधून मिळालेली नसल्यामुळे त्याने पाणी बंद केले. तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संवाद साधला असता, संबंधित ठेकेदाराचा करारनामा व ग्रामपंचायतीकडून बिले थकल्यामुळे पाणी बंद करण्यात आले, असे सांगितले. आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची गैरसोय होऊ नये, म्हणून खासदार, तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या फंडातून २५,००००/- तरतूद करून दिली. व तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यास सांगितले. शुक्रवार दि.२०मे रोजी पासून आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.