विधानसभा मतदार संघात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन…
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून २५ ते २८ मे या काळात शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. यासाठी खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे मेळावे घेण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.
यात बुधवार २५ मे सकाळी ११.०० वाजता कणकवली विधानसभा वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हॉल , एस टी वर्कशॉप जवळ, गडनदी पुला नजीक कणकवली,गुरुवारी २६ मे सकाळी ११.०० वाजता कुडाळ सिद्धिविनायक हॉल, २७ मे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सकाळी ११.०० वाजता वैश्यभवन हॉल गवळी तिठा सावंतवाडी या ठिकाणी हे मेळावे होणार आहेत यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन श्री पडते यांनी केले आहे.