You are currently viewing एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा आणणाऱ्या परिवहन मंत्र्यांचा जाहीर निषेध…

एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा आणणाऱ्या परिवहन मंत्र्यांचा जाहीर निषेध…

3 महिन्यांचा पगार द्या, अन्यथा आंदोलन करु….

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष – बनी नाडकर्णी

कुडाळ

कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव मुठीत घेऊन सतेज सेवा बजावणाऱ्या आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना सतत 3 महिने पगारासाठी भीक मागावी लागत आहे. असे असतानाही कर्मचारी 3 महिन्यांच्या पगाराची वाट पाहात होते परंतु कर्मचा-यांसाठी खुश खबर असे सांगून एक महिन्याचा पगार देऊन त्यांना भीक देताय का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी परिवहन मंत्र्यांना केला आहे. स्वतः च्या हक्काच्या पगारासाठी सुद्धा कर्मचा-यांवर ही वेळ आली आहे. त्यामूळे तीन महिन्यांचा कर्मचा-यांचा रखडलेला पगार न देता एक महिन्याचा पगार कामगारांना देऊन खुश खबर देणाऱ्या राज्य परिवहन मंत्र्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने तीवार निषेध करत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सांगितले आहे. दरम्यान श्री. नाडकर्णी यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री यांच्यावर घनाघाती आरोप केले आहे. वेळीच यावर तोडगा काढला नाही तर स्थानिक आमदारांच्या घरासमोर कामगार आपल्या कुटुंबासोबत रस्त्यावर उतरून घंटानाद आंदोलन करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल, आणि यावेळी कोणत्याही प्रकारचे विपरीत कृत्य घडले तर त्याला सर्वस्वी परिवहन मंत्री जबाबदार असणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा