MNGL च्या खोदाईमुळे वाहनचालकांची गैरसोय झाल्यास बांधकामाला घालणार घेराओ
दोडामार्ग
एम एन जी एल ही गॅस वितरित करणारी कंपनी पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूने खोदाई करत आहेत. मात्र सध्या मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे, त्यात साईडपट्टी खोदली मात्र ती व्यवस्थित भरली नाही त्यामुळे या पावसाने रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, कोणतीही कंपनी रस्ता साईडपट्टी खोदाई करताना बांधकाम विभागाकडे ती साईडपट्टी पूर्ववत करण्यासाठी निधी वर्ग करतो मात्र बांधकाम याकडे कधीच लक्ष देत नाही, बांधकामने येत्या चार दिवसात ही साईडपट्टी पूर्ववत न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराओ घालण्याचा इशारा दोडामार्ग शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस यांनी दिला आहे.
MNGL ही कंपनी गेस पाईपलाईन टाकते आहे, त्यासाठी बांदा ते माटणे पर्यंत साईडपट्टी च्या बाजूला खोदाई सुरू आहे, ही साईडपट्टी फक्त माती टाकून पूर्ववत करत आहेत, यात सध्या मान्सून पूर्व पाऊस पडत असून त्यामुळे ही साईड पट्टी खचते आहे तसेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, याला सर्वस्वी जबाबदार अशा वेळी काम करणारे ठेकेदार आणि बांधकाम विभाग असून यातुन अनुचित प्रकार घडल्यास त्याला बांधकाम विभाग जबाबदार असेल त्यामुळे ही साईडपट्टी पूर्ववत न केल्यास घेराओ घालण्याचा इशारा दिला आहे.