दात पडक्या आप्पा सहित पारावरच्या विठ्ठलाची तक्षिम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराच्या बैठका गेले काही दिवस बऱ्याचअंशी बंद होत्या. मोठ मोठे तक्षिमदार एकत्र येऊन सिंधुदुर्गात सुरू असणाऱ्या बैठका सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सर्वत्र छापे टाकून बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही दिवस का होईना जुगारच सारख्या अवैध धंद्यांवर टाच आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगार बंद असल्याने जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी सिंधुदुर्ग गोवा हद्दीवरील गोवा पेडणे येथे सुरू असणाऱ्या बैठकांमध्ये सामील होत होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील फोंडा येथे गेले आठ दिवस जुगाराची मोठी मैफिल बसत आहे. या जुगाराच्या बैठकीमध्ये दात पडक्या आप्पा याची 70 पैसे तर फोंडा येथील पारावरचा विठ्ठल म्हणून प्रख्यात असलेल्या विठ्ठलाची 20 पैसे आणि इतरांचे 10 पैसे अशी तक्षिम असते. फोंडा येथे बसणारी जुगाराची मैफिल कधी घाटातील हॉटेलच्या मागे कधी पाण्याच्या टाकीकडे तर कधी बागेत अशी वेळोवेळी जागा बदलून बसत असते. रोज संध्याकाळी फोंडा येथील मैफिल सजते. गेले दोन दिवस या बैठकीमध्ये अंदर बाहर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळते.
सिंधुदुर्गातील जुगाराच्या अड्ड्यावर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांनी छापे टाकून अड्डे बंद केले होते. असे असताना फोंडा येथे सुरू असलेल्या जुगाराच्या मैफिलीचे लोकेशन, माहिती पोलिसांना मिळत नाही का? सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्र जुगार बंद आहेत परंतु फोंडा येथे सुरु असल्याने स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगार अड्डे सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांनी फोंडा येथे सुरू असलेल्या या जुगार अड्डा याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.