परिसरात टस्कर मादी सह तीन पिल्ले
केर मोर्ले घोटगेवाडी ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील केर गावठाण वाडी येथे दहा दिवसापूर्वी देवतळी या ठिकाणी एक टस्कर एक मादी सह तीन पिल्लांचे दर्शन पहिल्यांदा केर गावठाण ग्रामस्थांना झाले
होतें त्यानंतर हत्तींनी यापरीसरात तळ ठोकला आहे त्यामुळे परीसरात फिरून नारळ सुपारी केळी फनस काजू बोडू आदीसह शेती बागायतीत नुकसानी सत्र सुरू ठेवल्याने शेतकरी हैराण झाले आहे मात्र प्रशासन सुस्त असून लोकप्रतिनिधी व पालकमंत्री यांनी वेळीचलक्षदेउनकार्यवाहीकरण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे
केर गावठाण येथे हत्ती कळप जगल सफरीचा व्हिडिओ निसर्ग प्रेमी तुषार देसाई यांनी काढला होता व वनविभाग याच्याकडे बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे हत्तीनी नुकसानी सत्रच सुरू ठेवल्याने केर मोर्ले घोटगेवाडी परिसरात ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
यापूर्वी तिलारी खोऱ्यातून हत्ती विजघर बाबडे हेवाले आदी भागात वावर होता तो आता या परिसरात दिवसा हती फिरत असून बागायती शेती सह फळ झाडे खाण्यासाठी झाडे उन्मळून टाकत आहेत त्यामुळे लाखों रुपयांची नुकसानी होत आहे कित्येक वर्षे काबाड कष्ट करून जगविलेली बागायती हत्ती एकाच वेळी नासधूस करुन ठेवत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे