You are currently viewing स्वागत

स्वागत

स्वागत

अशाच एका संध्याकाळी….,
मन जरा जास्तच उदास झालं होतं…
काय करू..? काहीच सुचत नव्हतं…
उगाच मनात विचार आला…
चला स्मशानात जाऊया…
गेलो मग स्मशानात एकटाच…!

बसलो एका थडग्याजवळ जाऊन…
थडगे ताजे वाटत होते.
मनात कुतूहल जागले…
थडग्यावरचे नाव वाचले…
महनाज खान, १९९०-२०१६
म्हणजे माझ्याच वयाची असेल,
कसं ग्रासले असेल मृत्यूने तिला..?
काय कारण असेल..?
आजार..? खून..?
का बाळंतपणात दगावली असेल ती..?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले…

…तेवढ्यात एक मुलगा तिथे आला…
हातातली फुले थडग्यावर ठेऊन तिथे बसला…
मी त्याला विचारले, तू भाऊ का तिचा…?
तो म्हणाला, ‘ नाही मीच तो,
जिच्यासाठी तिने आत्महत्या केली…!
मी विचारले, ‘ आत्महत्येच कारण…?
तो म्हणाला, ‘ मला ब्लड कॅन्सर झाला आहे, २ आठवडे उरले आहेत फक्त…!
मी चकित झालो…!
विचारले, ‘ मग तिने आत्महत्या का केली…? तू जिवंत असतानाही…?
तो म्हणाला, ” ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे…!

मी निशब्द….
.
.
.
.….. असही प्रेम असतं….!

एन्जॉय परेरा.

प्रतिक्रिया व्यक्त करा