You are currently viewing तळकट येथील नाट्यसंगीत क्षेत्रातील युवक आनंद भिसे यांचे निधन..

तळकट येथील नाट्यसंगीत क्षेत्रातील युवक आनंद भिसे यांचे निधन..

दोडामार्ग

तळकट येथील नाट्यसंगीत क्षेत्रातील युवक आनंद भिसे यांचे दिनांक १७ मे रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने तळकट व आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आनंद भिसे यांचा स्वभाव मनमेळावू असल्याने ते गावात प्रिय होते . त्यांना संगीत क्षेत्रा बरोबरच नाट्य कलेची आवड असल्याने ते ऐतिहासिक नाट्यप्रयोगात शिवाजी महाराजांची भूमिका निभावत. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुली, बहीणी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा