पुणे (पिंपरी) :
नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट वतीने दि. १४ आणि १५ मे रोजी सातवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य अञे रंगमंदिर,पिंपरी,पुणे येथे उत्साहात संपन्न झाले.महाकाव्यसंमेलनाचे उदघाटक म्हणुन श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले महाराज (अक्कलकोट संस्थान,सोलापूर)उपस्थित होते.प्रमुख पाहुणे उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल,पुणे,अॅड.प्रफुल्ल भुजबळ महाराज,डाॅ.कैलासभाऊ कदम,सुखदेवतात्या सोनवणे,नगराध्यक्ष सौ.शोभा कऊटकर,सौ,जया बोरकर,कर्नल साठे,आशिष कदम,इ.मान्यवर उपस्थित होते.
महाकाव्यसंमेलनाचे प्रास्ताविक नक्षत्राचं देणं काव्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.स्वागताध्यक्ष शंभूदादा पवार,श्रीमंत मालोजीराजे महाराज भोसले,उद्योजक कृष्णकुमार गोयल,अॅड.प्रफुल्ल भुजबळ महाराज ,राजेंद्र धावटे,राजन लाखे,उदय सर्पे,प्रा.तुकाराम पाटील,जयंत भावे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी महाकाव्यसंमेलन अध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,”कवीला निरीक्षणाची तिक्षण नजर पाहीजे.समाजाच्या प्रखरतेला,वेदनेला टिपता आले पाहीजे.सांस्कृतिक भूक समाजाची भागण्यासाठी अशा महाकाव्यसंमेलनाची गरज आहे.” आजवरच्या वाटचालीतील गमतीशीर आठवणी, विनोदी किस्से, सोबत हास्य कवितांची पेरणी. यामुळे हशा, टाळ्यांसह प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत रंगतदार ठरली. या दोन दिवशीय महाकाव्य संमेलनात विविध विषयावर परिसंवाद, स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये लातूर येथील नवोदित कवी डॉ. सुशिल सातपुते यांनी सद्य परिस्थितीवर आधारीत पत्रकार परिषद व चर्चा या विषयावर कविता सादर केली
“मी पाहत नाही आज काल चित्रपट थिएटरवरचा
पाहतो पत्रकार परिषद अन् चॅनलवरचा चर्चा ,
इथेच भेटतात मला नटी अन् नट
मग मी कशाला पाहू चित्रपट”
या कवितेला व्यासपीठावर मान्यवरांनी तसेच रसिकांनी भरभरून दाद दिली. मान्यवरांच्या हस्ते डॉ.सुशिल सातपुते यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी अशोक नायगावकर यांनी शाकाहारी ही प्रसिद्ध कविता सादर केली. त्याला भरभरून दाद मिळाली.
“नख खुपसून अंदाज घेत, क्रुरपणे त्वचा सोलली जाते, दुधी भोपळ्याची.
सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे.
डोळ्यांची आग होते आहे. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे.
भाजले जाते वांग, निथळतयं त्वचेतून पाणी टप टप….!”
या महाकाव्यसंमेलनात सर्व सहभागी कवी कवयिञी यांना महाकाव्यसंमेलन स्मृतीचिन्ह,सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वगीत पसायदानाने महाकाव्यसंमेलनाची सांगता करण्यात आली.