You are currently viewing साकेडी सोसायटी निवडणुकीत भाजप शिवसेना साथ साथ…

साकेडी सोसायटी निवडणुकीत भाजप शिवसेना साथ साथ…

अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला ; तडजोडीची जिल्‍ह्यात चर्चा…

कणकवली

जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्‍या सर्व सोसायट्यांच्या निवडणूका शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद लावून लढविल्‍या. मात्र तालुक्‍यातील साकेडी सोसायटी निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी तडजोड केली. त्‍यामुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. तसेच सोसायटीचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेना कार्यकर्त्याला देण्याचे निश्‍चित झाले.
कणकवली तालुक्यातील साकेडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व जागांवर आपापले पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संस्थेच्या हिताकरीता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडींसह सर्व संचालक बिनविरोध निवडण्याचे निश्‍चित करण्यात आले. यानुसार भाजपप्रणित पॅनेलला ७ जागा तर शिवसेना पॅनेलसाठी ५ जागांवर तडजोड झाली. याखेरीज अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेलाही देण्यावर एकमत झाले.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवड प्रक्रिया झाली. यात अध्यक्षपदी भाजपचे संजय शिरसाट आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे बबन राणे यांनी बिनविरोध निवड झाली.या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक बंडू साटम, कृष्णा सदवडेकर, सुवर्णा सावंत, सत्यवान मुणगेकर, इक्बाल शेख, अकबर शेख, स्नेहा लाड, ग्रामस्थ रमाकांत सापळे, गट सचिव श्री. डगरे, आदी उपस्थित होते निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री खांडेकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा