You are currently viewing कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित शोभायात्रेचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ

कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित शोभायात्रेचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ

शोभायात्रेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कुडाळ शहर दुमदुमले

शोभायात्रेतून घडविण्यात आले भारतीय संस्कृतीचे दर्शन

कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने १७ ते २० मे २०२२ या कालावधीत कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर सिंधु कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनानिमित्त कुडाळ शहरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. कुडाळ शहरात पोलीस स्टेशन ते जिजामाता चौक तेथून गांधी चौक, पंचायत समिती ते गुलमोहोर हॉटेल मार्गे महोत्सव स्थळ अशी शोभायात्रा काढण्यात आली.दरम्यान याप्रसंगी खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कुडाळ शहर दुमदुमुन गेले.

शोभायात्रेत बैलगाड्या, विविध प्राणी, चलचित्र रथ त्याबरोबरच विविध चित्ररथ, वारकरी दिंडी,पारंपारिक वेशभूषेत महिलांचा सहभाग, लेझीम पथक, मोटारसायकल रॅली आदींच्या सहभागातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा पार पडली. एकंदर भारतीय संस्कृतीचे दर्शन शोभायात्रेतून घडविण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जी. प. सदस्य नागेंद्र परब, तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण,कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, एमआरजीएस गटविकास अधि. व्ही. एम. नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, रुची राऊत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,अतुल बंगे, जयभारत पालव, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ संजय भोगटे,सुशील चिंदरकर, योगेश धुरी, रुपेश पावसकर,सचिन काळप,उदय मांजरेकर, गुरु गडकर, संदीप म्हाडेश्वर, नितीन सावंत आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध खात्यांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक सरपंच, शेतकरी व कुडाळ चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा