You are currently viewing बँक लॉकरमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू(सोने) सुरक्षित आहेत का ?

बँक लॉकरमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू(सोने) सुरक्षित आहेत का ?

 

जर आपण आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये काही अत्यंत गरजेच्या गोष्टी किंवा सोने ठेवले आहे आणि आपल्याला वाटत आहे की हे संपूर्णपणे सुरक्षित आहे, तर आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की बँकेत चोरी, आग किंवा काही इतर कारणाने लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले तर बँका याची जबाबदारी घेत नाहीत.

लॉकरमध्ये ठेवलेले सोने किंवा काही किंमती सामान किती सुरक्षित आहेत यावर २०१७मध्ये रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांवर लक्ष द्या. याच्या अनुसार काही दुर्घटना झाल्यास लॉकरमध्ये ठेवलेल्या किंमती वस्तूंची भरपाई ग्राहकाला देण्याची कुठलीही जबाबदारी बँकांची नाही.

 

याचा अर्थ असा की कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, म्हणजे दरोडा, आग, एखादे   युद्ध इ. झाल्यास बँका आपल्या ग्राहकांना भरपाई देणार नाहीत.

याचे कारण असे आहे की लॉकरबाबतच्या करारात देय भरपाईचा उल्लेख कुठेही नाही आणि आपल्या मौल्यवान वस्तूंचा विमा उतरवण्याची सर्व जबाबदारी ही त्या ग्राहकाची असते.

जेव्हा लॉकरमध्ये कोणतीही चोरी, दरोडा झाल्यास नुकसानाची जबाबदारी बँका घेत नाहीत, त्यावेळी हे अतिशय गरजेचे असते की आपण आपल्या लॉकरमध्ये किंवा घरी ठेवलेल्या सोन्याचांदीचा विमा करा. चांगली गोष्ट ही की सोन्याचा विमा केल्यावर बँकांच्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्याची फारशी गरजही उरत नाही.

सोन्याची गुंतवणूक ही कायम फायदा करुन देणारी राहिली आहे. थेट गुतंवणूक करुन असो किंवा कर्ज पद्धतीने सोन्याच्या गुंतवणुकीतून फायदाच झाल्याचे समोर येते.

परंतु लॉकरमध्ये असलेल्या सोन्याची किवा कोणतीही चोरी, दरोडा झाल्यास नुकसानाची जबाबदारी बँका घेत नाहीत, त्यावेळी हे अतिशय गरजेचे असते की आपण आपल्या लॉकरमध्ये किंवा घरी ठेवलेल्या सोन्याचांदीचा विमा करा. चांगली गोष्ट ही की सोन्याचा विमा केल्यावर बँकांच्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्याची फारशी गरजही उरत नाही.

जेव्हा १५ ऑगस्ट १९४७मध्ये देश स्वातंत्र झाला होता तेव्हा १० ग्रॅम सोन्याचा दर १०० रूपयांहूनही कमी होता. तर २०२० मध्ये सोन्याचा दर विक्रमी प्रती दहा ग्रॅम ५५००० रुपयांची पातळी गाठून आला आहे.

कोरोनाकाळात सातत्याने सोन्या-चांदीचे दर वाढत आहेत. दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे विक्रम गाठत आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना खरेदी करता येत नाही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा