You are currently viewing पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर.

पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर.

२० मे दिवशी पुणे येथे पुरस्कार होणार प्रदान.

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन पर्यवेक्षक उमेश विठ्ठल पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत सर्वस्तरातून उमेश पेंडुरकर यांचे अभिनंदन होत आहे. जागतिक पशुवैद्यक दिन सन 16 करिता पशुसंवर्धन विभागातील गुणवंत पशुवैद्यककांना पुरस्कार प्रदान करणे अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या सं वर्गामध्ये गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराकरिता पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनांक २० मे २२ रोजी सकाळी अकरा वाजता माननीय शरद चंद्रजी पवार सभागृह जिल्हा परिषद पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र डॉक्टर धनंजय परकाळे यांनी उमेश पेंडुरकर यांना लेखी स्वरुपात दिले आहे. उमेश पेंडुरकर यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. या कामाची दखल पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन या पुरस्कारासाठी उमेश पेंडुरकर यांची निवड केली. याबाबत विविध राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषद मधील सर्व अधिकारी वर्ग, कृषी अधिकारी, सर्व सहकारी कर्मचारी यांनी उमेश पेंडुरकर यांचे अभिनंदन केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा