You are currently viewing खेळ पराभव पचविण्यास शिकवतो

खेळ पराभव पचविण्यास शिकवतो

*खेळ पराभव पचविण्यास शिकवतो*

कमांडंट देवराज गिल; एमआयटी एडीटी विद्यापीठात “पेरा’ प्रिमिअर चॅंम्पियनशिपचे उद्‌घाटन

पुणे

“खेळ हा प्रत्येकाच्या जिवनात अमुलाग्र बदल घडविणारी गोष्ट असून त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य आबादीत राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाल आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते,’ असे मत पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज गिल यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे आयोजित “पेरा’ प्रीमिअर चॅंम्पियनशिपच्या उद्‌घाटन समारंभावेळी बोलत होते. “एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष व “पेरा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिंम्पियन बॉक्‍सर मनोज पिंगळे, डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठाचे डॉ.गुलजार शेख, एमआयटी डब्लूपीयूचे पोपट धानवे, डॉ.अतुल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, प्रा.डॉ.कराड म्हणाले की, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वच आघाड्यांवर पुढे जात आहे. खेलो भारत, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम सारख्या योजनांमुळेच भारताने हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदकांचे शतक पूर्ण केले. त्यातूनच प्रेरणा घेत “पेरा’ चॅंम्पियनशिपच्या माध्यमातून राज्यातील नामांकित खासगी विद्यापीठांनी एकत्रित येत या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले व ज्याला तब्बल 35 विद्यापीठांनी उत्तम प्रतिसाद दिला, ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली आहे. एमआयटी शिक्षण समुहाने कायमच “विश्‍वनाथ स्पोर्टस मिट’सारख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याचे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे “पेरा’च्या माध्यमातून सहभागी खेळाडूंनी पुढे जाऊन आपल्या देशाचे नाव मोठे करावे यासाठी माझ्या मनस्वी शुभेच्छा!
विश्‍वशांती प्रार्थना व दिपप्रज्वलनानंतर “मॅनेट’ बॅंडच्या आकर्षक सलामीद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व सहभागी विद्यापीठांच्या ध्वजवाहक यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंचे संचलन मैदानावर घेण्यात आले. त्यामध्ये 35 हून अधिक विद्यापीठांतील 3,000 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. हे सर्व खेळाडू पुढील तीन दिवस 15 हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचे कौशल्य पणाला लावणार आहेत. उद्‌घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.सुराज भोयार यांनी केले तर आभार “पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − two =