You are currently viewing सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व राजेश विरनोडकर विजयी…

सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व राजेश विरनोडकर विजयी…

सावंतवाडी

सांगली येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर आणि रॅपिड स्पर्धेत राजेश विरनोडकर या दोघांनी पारितोषिके मिळवली. बाळकृष्ण याने सहा दिवस घेण्यात आलेल्या ५३ व्या कै.श्री.बाबुकाका शिरगावकर क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रेटींग कॅटेगरीत तिसरा क्रमांक मिळवला. तर दोन दिवस घेण्यात आलेल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला आणि राजेश विरनोडकर याने १६ वर्षे वयोगटात दुसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातील १०१ खेळाडु उपस्थित होते. पारितोषिकप्राप्त खेळाडुंना रोख बक्षिसे, ट्राॅफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे आणि अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

25

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − one =