You are currently viewing चक्रीवादळातील नुकसानग्रस्त नौका मालकांचे समुद्रातील उपोषण तूर्तास स्थगित – योगेश चांदोस्कर

चक्रीवादळातील नुकसानग्रस्त नौका मालकांचे समुद्रातील उपोषण तूर्तास स्थगित – योगेश चांदोस्कर

देवगड

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दि.२३ मे २०२२ रोजी स.११ .० वा.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई विभाग यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत आवश्यक ती चर्चा करण्यात येणार असून सामाजिक कार्यकर्ते व नौका मालक यांनी समुद्रात उपोषणाचा मार्ग न स्वीकारता शासनास सहकार्य करावे असे लेखी पत्र सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग, तहसीलदार देवगड यांनी उपोषण कर्त्याना दिल्यानंतर देवगड येथील तौक्ते वादळतील नुकसानग्रस्त नौका मालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मंगळवारी सकाळी १० वाजलेपासून सुरू केलेले आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर यांनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळ होऊन १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यांचं दिवशी देवगड बंदरातील तीन नौका फुटून पूर्णतः नष्ट झाल्या .या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही आद्यप पर्यंत शासनाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोसकर यांनी मच्छीमारांना न्याय मिळवण्यासाठी आनंदवाडी प्रकल्पा नजीक मासळी लिलाव भाटी येथे आमरण उपोषणास बुधवारी सकाळी १० वाजले पासून सुरुवात झाली. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण स्थगित करणार नाही असा असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर,नौका मालक,पांडुरंग कोयंडे, अक्षता कोयंडे, रघुनाथ कोयंडे, यांनी घेतला. दरम्यान शासन प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून समुद्र किनारी या उपोषणास सुरुवात करण्यात आली.पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस कर्मचारी राज्य राखीव पोलीस दल तुकडी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात करण्यात आली होती.या ठिकाणी नगरपंचायत गटनेते नगरसेवक शरद ठुकरूल,उद्योगपती नंदकुमार घाटे,यांत्रिक नौका मालक संघ पदाधिकारी जगन्नाथ कोयंडे,यांनी उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला .अन्य स्थानिक मच्छिमार या वेळी उपस्थित होते.

तौक्ते चक्रीवादळ होऊन १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यांचं दिवशी देवगड बंदरातील तीन नौका फुटून पूर्णतः नष्ट झाल्या .या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही आद्यप पर्यंत शासनाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नाही त्या बाबत योग्य तो न्याय ,नुकसान भरपाई दि.१६ मे २०२२ पर्यंत मिळावी.अन्यथा दि.१७ मे समुद्रात बसून कुटुंबियांसमवेत आमरण उपोषण करणार असल्याचे देवगड मधील सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर , नौका मालक,पांडुरंग विनायक कोयंडे, अक्षता नीरज कोयंडे, रघुनाथ यशवंत कोयंडे, यांनी सहा .मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग मालवण याना दिला होता सामाजिक कार्यकर्ते,व तिन्ही नौका मालक यांना ३० एप्रिल २२ रोजी मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत यापूर्वी पत्र देऊन उपोषणाचा मार्ग न स्वीकारणे असे कळविले होते.त्या पत्राला मान देऊन दि १६ मे पर्यंत उपोषण स्थगित केले असल्याचे नमूद करून दि १७ मे रोजी कांबळे यांनी घटनास्थळावर भेट देत उपोषण मागे घ्या अशी विनंती करण्यात आली तसेच मत्स्य विभागाचे अधिकारीदेखील घटनास्थळावर आले परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोसकर व नुकसानग्रस्त मालकांनी घेतला होता

मत्स्य विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीला मत्स्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार का? स्थानिक अधिकार्‍यांशी आम्ही चर्चा करणार नाही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतीलअसे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आम्ही उपोषण मागे घेणार असा आक्रमक पवित्रा चांदोस्कर यांनी घेतला होता त्या नंतर सहा. मत्स्यव्यवसाय संचालक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई यांचे उपस्थितीत बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल असे लेखी पत्र उपोषणकर्ते याना दिल्यानंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आले आहे.अशी माहिती श्री चांदोस्कर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा