कु रिया सावंत,अपुर्वा शेलार व दिक्षा पाताडे यांची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये होणार नोंद.
कणकवली
मंगळावरील वस्ती आभासी कार्यशाळा तसेच गीनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात कणकवली तालुक्यातील कासार्डे देऊलकरवाडी प्राथमिक शाळा आणि कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यिनीं अनुक्रमे कु.रीया विश्वास सावंत, कु.अपुर्वा रणदीप शेलार व कु.दिक्षा अरविंद पाताडे यांनी गगन भरारी घेत अभिनंदनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या उपक्रमची ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकरच नोंद होणार आहे अशी माहिती शिक्षिका सौ.पुजा पाताडे यांनी दिली .
या विद्यार्थ्यिनी नवार्स एज्युटेक हैद्राबाद आयोजित मंगळावरील अभासी वस्ती प्रयोग कार्यशाळा आणि गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड या अभिनव उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. चार दिवसांच्या कार्यशाळा त्यांनी यशस्वीपणे पुर्ण करुन हा उपक्रम यशश्वीरीत्या पूर्ण केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे सारख्या ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करुन यश संपादन केलेल्या या कासार्डेतील तीनही सुकन्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हैदराबाद येथील ऐज्युटेक संस्थेने आयोजीत केलेल्या तसेच मिती ऐज्युकेशनल फौउडेशन पुणे, झेनीथ ओटोमेशन मुंबई यांच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ.निता आ. पाताडे- लोटलीकर यांच्या विशेष सहकार्याने व मागदर्शनाखाली कासार्डे ग्राप व देऊलकरवाडीत हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये कासार्डे देऊलकरवाडी शाळेतील कु.रीया विश्वास सावंत व कु.अपुर्वा रणदीप शेलार आणि कासार्डे माध्यमिक विद्यालयामधील इ.७वी अ मधील कु.दीक्षा अरविंद पाताडे या विद्यार्थिनींनी मंगळावरील अभासी वस्तु कार्यशाळा आणि गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड सहभाग घेत आपले वैज्ञानिक जिज्ञासा, अंतराळातील कसब दाखविले आहे.
या चार दिवसांच्या कार्यशाळेत जर मंगळावर वस्ती करायची असेल तर कोणती प्राथमिक पुर्व तयारी केली पाहिजे, त्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेताना आपली जीवनशैली कशी असावी. मंगळावर मानवाला कोणत्या अडचणी येऊ शकतात? पाणी, तसेच आहार कसा घ्यायचा आणि तो कसा बनवायचा, तसेच त्याठिकाणी येणा-या समस्येवर कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतात… यावर आधारित सविस्तर चार दिवसांचे आॅनलाईन प्रेझेंटेशनमार्फत माहिती देण्यात आली.. तसेच, हायड्रोलिक लॉन्चर, रॉकेट डिझाइन, सोलर कुकर, कोडी सोडवणे, तसेक
किरणे आव्हान यावर आधारित प्रयोग करुन त्याचे निष्कर्षही विद्यार्थ्यांनी काढले या अभिनव उपक्रमात आणि सादरीकरणात या तीनही विद्यार्थ्यिनी यशस्वी ठरल्या आहेत.
*नासाच्या शास्त्रज्ञांचे लाभले मार्गदर्शन*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या कासार्डेतील तीनही कन्यांना नासाच्या शास्त्रज्ञांचे आॅनलाईन पध्दतीने विशेष मार्गदर्शन लाभले असून हा उपक्रम वर्षभर सूरू राहणार आहे.
*भारतासह जगभरातील निवड विद्यार्थ्यांचा सहभागी*
या उपक्रमात महाराष्ट्रातील काही निवडक विद्यार्थ्यांमध्ये सिंधुदुर्गातून फक्त तीघींचा समावेश होता तसेच भारतातील विविध राज्यांतील काही निवड विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर जगभरातून बहुतांश देशातील निवडक विद्यार्थ्यांचाही सहभाग या उपक्रमात झालेला होता.
हा उपक्रम राबविण्यासाठी कासार्डे विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ.पुजा गणेश पाताडे तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कासार्डे देऊलकरवाडी शाळेचे विशेष सहकार्य मिळाले. या यशस्वी विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या सौ. निता आ. पाताडे- लोटलीकर तसेच सौ.पुजा पाताडे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.