You are currently viewing गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना*

*गौतम बुद्ध*

राजा शुद्धोधन पुत्र,

माता त्यांची महामाया.

गौतम शाक्यमुनी नामे,

दिसे शांत ध्यानस्थ काया.

आकाशा एवढा ज्ञानी,

म्हणूनी देती बुद्ध उपाधी.

अवघ्या जगी सर्वश्रेष्ठ,

तथागत बुद्ध हेची संबोधी.

विचल झाले मन तयांचे,

असंख्य पीडा पाहता नगरी.

सत्याची त्यांस जाण झाली,

पाहिले दुःख दारिद्र्य घरोघरी.

सुखाचा अंत दुःखच दिसता,

सन्यासमार्ग अंतिम शोधला.

स्वजनांच्या उद्धारासाठी

आत्मशोधाचा मार्ग चालला.

शारीरिक भोग दूर सारून,

ध्यान मार्गाचा स्वीकार केला.

अश्वत्थ वृक्षाखाली दिव्यज्ञान,

प्राप्तीयेले वैशाख पौर्णिमेला.

धम्मचक्रप्रवर्तन उपदेशात,

बौद्ध धम्म मूलतत्त्वे मांडली.

बौद्ध धम्म वाढविण्या त्यांनी,

लोकांस बौद्ध धम्म दिक्षा दिली.

दुःख दैन्य दारिद्र्य सर्व,

नाहिसे करणे उद्देश होता.

दुःखाचे अस्तित्व मानूनी,

नष्ट करणे हा पाया मोठा.

लुम्बीनी जन्मूनी तथागतांचे,

कुशीनगरी महापरिनिर्वाण झाले.

पावनभूमी कुशीनगर पुढे ते,

जागतिक बौद्ध तिर्थस्थळ बनले.

(दिपी)✒️

दीपक पटेकर, सावंतवाडी.

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा