ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश; पागावाडी येथे जलपूजन…
बांदा
सातत्याने गेली अनेक वर्षे इन्सुली ग्रामस्थांची पाण्याची असलेली मागणी अखेर आज पूर्ण झाली. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी इन्सुली पर्यंत दाखल झाले. इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर व माजी पंचायत समिती सदस्य नारायण यांच्यासह मान्यवरांनी पगावाडी येथे जलपूजन केले. सुमारे २० वर्ष कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा आज संपली.
यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच नारायण राणे, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, विभाग प्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स,शाखाप्रमुख आपा आमडोसकर, सहदेव सावंत, बाळा सावंत, अक्षय नाईक, महादेव मुळीक, कुंदन सावंत, आनंद मुळीक, सहदेव मुळीक आदींनी कालव्याला पाणी आले त्या निमित्ताने जलपूजन केले. शिवसेना इन्सुलीच्या वतीने देखील जल पूजन करण्यात आले. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांचे पाणी आज येणार, उद्या येणार असे सांगितले जात होते. अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली. ओटवणे येथे कालव्याच्या लाईन मध्ये दगड होता. त्यामुळे तो काढण्यासाठी ठेकेदार चाल ढकल करत होता. गेली दहा वर्षे ते काम रेंगाळत होते. त्यामुळे आंदोलने देखील झाली आहेत. इन्सुली गावात कालव्याचे पाणी दाखल झाले त्यामुळे गावच्या वतीने सरपंच गजानन उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांनी स्वागत करत जलपूजन केले. तसेच ग्रामस्थांनी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.